कधी कधी. ..
कधी कधी. ..
शब्द आठवतच नाहीत जसेच्या तसे
पण त्या मागच्या भावना व्यापून उरतात गात्रा गात्रातून
अस्वस्थ होत जातं सगळं जगणंच
त्यांना निरोप देण्यासाठी अश्रू जमा होतात मग पापण्यांत खळकन निखळतात
अन् लपतात मग गालावरच्या खळीत आणि ओठावर हसू फुलवतात
हे हसू पुन्हा पोहोचते डोळ्यांच्या किनाऱ्यावर
आणि पुन्हा साचतं तळं खळींत
प्रतिबिंब डोळ्यांचे कायमच खळीत...
