STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Tragedy

3  

Pratiksha vaibhav Kulkarni

Tragedy

खोली

खोली

1 min
183

चार भिंतींनी बंदिस्त अशी छोटीशी ती खोली होती

आमच्या तिथे राहण्याने नव्याने तीे बहरली होती

घरापासून दूर तरी घरासारखीच भासत होती

त्या छोट्याश्या खोलीत राहून आमची मैत्री मात्र फुलत होती।।


अनोळखी होतो एकमेकिसाठी, ओळख अजून बाकी होती

कोण जाणे कशी काय, मैत्री आमची खुलत होती

दंगा मस्ती भांडण याची मज्जाच काही और होती

त्या छोट्याश्या खोलीत मैत्री आमची फुलत होती।।


एकमेकींच्या सहवासात वेगळीच मौज होती

मन मोकळं करण्यासाठी तीच मैत्री हक्काची होती

अश्रूंसोबत मस्तीचीही ती खोली साक्षीदार होती

त्या छोट्याश्या खोलीत मैत्री आमची फुलत होती।।


छोट्याछोट्या गोष्टीतही आनंदाची बहार होती

अबोल त्या भांडणांमध्येही प्रेमाची छटा होती

गप्पागोष्टीनी सकाळ आणि धमालमस्तीने रात्र संपत होती

त्या छोट्याश्या खोलीत मैत्री आमची फुलत होती।।


आज मात्र आमच्यासोबत ती खोलीही स्तब्ध होती

आमच्या सोडून जाण्याने जणू ती ही हिरमुसली होती

सहवास आता संपणार होता, मैत्री मात्र अतूट होती

लहानग्या त्या खोलीने मात्र मनाची नाती जपली होती

या सगळ्याने आयुष्याला एक सुंदर बहार दिली होती

त्या छोट्याशा खोलीत मैत्री आमची फुलली होती।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy