STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

4  

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

घर

घर

1 min
398

दगड विटा वाळू मिळून उभारल्या चार भिंती

शोभा त्यास आली जेव्हा मिसळली त्यात नाती

डौल आला त्याला जेव्हा छत उभे राहिले वरती छताखाली त्या जपली गेली प्रेम जिव्हाळा आपुलकी।।


नात्यांनी त्या घराला ओलावा दिला मायेचा

आजी आजोबांनी तिला त्यात स्पर्श अनमल संस्कारांचा

चिऊ काऊच्या गोष्टींनी आनंद दिला बालपणाच्या

यातूनच जपली गेली मानसासोबतची माणुसकी

छताखाली त्या जपली गेलीप्रेम ,जिव्हाळा ,आपुलकी।


घरात त्या वाहिला सतत झरा प्रेमाचा

आई बाबांनी सतत दाखवला किरण नवीन आशेचा

माणसासोबत घरानेही राखला आदर परंपरांचा

सण समारंभात चढली तोरणे दारावरती

छताखाली त्या जपली गेली प्रेम जिव्हाळा आपुलकी।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational