STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Romance

3  

Pratiksha vaibhav Kulkarni

Romance

अनुभवलंय मी

अनुभवलंय मी

1 min
392

अनुभवलंय मी हिरव्या हिरव्या झाडांना ऐन पावसाळ्यात बहरताना 

हवाहवासा वाटनाऱ्या त्याच क्षणांचा ओलावा घेताना।।

तसच काहीस अनुभवलंय मी त्याच्यामध्ये स्वतःला हरवून जाताना।।

वाहत्या पाण्याच्या ओघासोबत स्वतःलाही वाहत जाताना

 तसच काहीस अनुभवलंय मी त्याच्यामध्ये हरवून जाताना

वाऱ्याच्या प्रवाहाप्रमाणे स्वतःलाही बेधुंद वावरताना

अनुभवलंय मी त्याच्या प्रत्येक श्वासासोबत स्वतःला जोडत जाताना।

तसच काहीस अनुभवलंय मी त्याच्यामध्ये हरवून जाताना।।

गुलाबी थंडीच्या अलौकिक प्रवाहात स्वतःला लपेटून घेताना

अनुभवलंय मी त्याच्या मिठीत जगाला विसरून मनाला विसावताना।

तसच काहीस अनुभवलंय मी त्याच्यामध्ये स्वतःला हरवून जाताना

निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीत त्याचीच चाहूल शोधताना

अनुभवलंय मी पहिल्या प्रेमाची उब अंगावर घेताना

तसच काहीस अनुभवलंय मी त्याच्यामध्ये स्वतःला हरवून जाताना

हेच अनुभवलंय मी त्याच्याशी समरस होताना।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance