पहाट
पहाट
1 min
416
दाटून आले ढग काळे जीवन सारे अंधारले
कुठल्याश्या या संकटाने जग सारे होरपळले
असे जरी सावट मोठे,शेवट हा नक्की नसे।
अंधारल्या या रात्रीनंतर आशेची तेजस्वी पहाट दिसे।।
सभोवतालच्या अंधारात जरी घातले थैमान काळोखाने
काळोखावर त्या मात करण्या सज्ज सारे एकजुटीने
माणसातील दैवी शक्तीची प्रचिती आली पुन्हा नव्याने
संघर्ष हा अटळ जरी अशक्य मात्र मुळी नसे।
अंधारल्या या रात्रीनंतर आशेची तेजस्वी पहाट दिसे।।
स्थिती आहे बिकट जरी,करून जाऊ चाल त्यावरी
एकजुटीची मिसाल ही जल पसरवेल त्या निखाऱ्यावरी
दूर होतील मग ढग काळे , येईल झुळूक सुखाची दारी
येता बहर आनंदाला दुःखाचे व्रणही होतील मग नाहीसे।
अंधारल्या या रात्रीनंतर आशेची तेजस्वी पहाट दिसे।।