STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Romance

2  

Pratiksha vaibhav Kulkarni

Romance

तू आणि मी

तू आणि मी

1 min
46

सहज पाहिलेल्या स्वप्नांनाही सत्याचा परिसस्पर्श व्हावा

नुकत्याच उमललेल्या कळ्यांनी निसर्गाशी संवाद साधावा

मनाच्या प्रत्येक कोपऱ्याने फक्त तुझाच ठाव घ्यावा

आणि तो प्रत्येक क्षण तुझ्या सोबत असण्यानेच बहारावा।।


रात्रीच्या अंधाराने त्या शुक्र चांदणीचा आधार घ्यावा

तिच्या असण्याने अंधाराला ही उजेड दिसावा

तसाच तुझ्या असण्याने माझा अन माझ्या असण्याने तुझा जीवनप्रवास परिपूर्ण व्हावा

आयुष्याच्या प्रत्येक अंधाराला प्रकाशाचा मार्ग दिसावा

आणि तो प्रत्येक क्षण तुझ्या सोबत असण्यानेच बहारावा।।


सुखदुःखाच्या प्रवाहात मनाला मात्र तुझाच आधार असावा

फक्त तुझ्या अस्तित्वाने माझ्या आयुष्याला बहर यावा

आकाशाला गवसणी घालणारा हाकेचा माझा आवाजही फक्त तुझ्याच नावाचा असावा 

आणि तो प्रत्येक क्षण तुझ्या सोबत असण्यानेच बहारावा।।


माझ्या प्रत्येक श्वासावर फक्त तुझाच हक्क असावा

हृदयाच्या प्रत्येक ठोक्यानेही तुझाच ठाव घ्यावा

तुझा प्रत्येक सहवास माझ्या हृदयात जपावा

आणि तो प्रत्येक क्षण तुझ्या सोबत असण्यानेच बहारावा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance