STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Others

4  

Pratiksha vaibhav Kulkarni

Others

पणती

पणती

1 min
516

ज्या घरी जन्म झाला, ते ही नव्हते हक्काचे

ज्या घरी नांदण्यास गेले, ते तर मुळातच माझे नव्हते

दोन्ही घरांना जोडून ठेवण्यात आयुष्यभर धडपडले

यानेच स्त्री जन्माचे सारे आयुष्य व्यापले।।


जन्म झाला त्याच वेळी परक्याचे धन मी ठरले

अंगणी त्या बागडताना घराचा त्या श्वास बनले

आई बाबांची बाहुली , आजीआजोबांची परी मी झाले

अचानक या घरासाठी पाहुनी मी होऊन गेले

यातच स्त्री जन्माचे सारे आयुष्य व्यापले।।


कन्यादानासारख्या पवित्र विधीने मी सासरची सुन झाले

लग्नसंस्काराच्या विधीने मग एका वेगळ्या कुटुंबाशी बांधली गेले

त्या नात्यांना आपलंसं करण्यात मग मी गुरफटून गेले

नकळत मग माहेरच्यांसाठी अनोळखी होत गेले

यातच स्त्री जन्माचे आयुष्य सारे व्यापले।


नाते जोडता जोडता संसारात त्या तल्लीन झाले

दीर नणंद भाऊ बहीण, तर सासू सासरे आईवडील बनले

मने साऱ्यांची जपण्यात मग मी स्वतःलाही विसरले

पतीच्या सुखासाठी मी माझे सारे आयुष्यही वाहिले

यातच स्त्री जन्माचे आयुष्य सारे व्यापले।


आई बाबांची बाहुली आज सासरचीही लाडकी बनले

पतीच्या साथीने मी एक आदर्श पत्नीही ठरले

मुले बाळे सांभाळताना स्वतःच अस्तित्वही विसरले

तत्यांच्यातच आता माझे सारे जग सामावले

दोन्ही घरांना उजळून टाकणारी पणती मी ठरले

यातच स्त्री जीवनाचे आयुष्य सारे व्यापले।।



Rate this content
Log in