STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

4  

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

स्त्री जन्मा तुझी कहाणी

स्त्री जन्मा तुझी कहाणी

1 min
29

स्त्री जन्मा तुझी कहाणी

संपूर्ण असूनही का अधुरी 

आई तू, पत्नी तू, बहिण तू ,लेक तू

तरी का दोन्ही घरी कायम परकीच तू

दोन्ही घरा उजळूनी कहाणी तुझी

संपूर्ण असूनही का अधुरी....


कधी आकाशवेल तू तर कधी देशरक्षिणी तू,

कधी देश चालवणारी तू,तर कधी यशस्वी खेळाडू तू,

दाही दिशांमध्ये कीर्ती परसरूनही कहाणी तुझी

संपूर्ण असूनही का अधुरी....


कधी गृहिणी तू,कधी नोकरदार तू.

घरचा खंबीर आधार तू,लेकरांचा निखळ आनंद तू

घरच्या प्रत्येक कोपऱ्यांमध्ये वास असूनही कहाणी तुझी

संपूर्ण असूनही का अधुरी....


एवढे असूनही कधी भ्रूणहत्येचा बळी तू ,कधी निर्भया तू,कधी पीडित तू 

आणि एवढ्या मोठ्या प्रगतशील युगात

अजूनही असुरक्षित तू...

मानवजातीची जन्मदात्री असूनही कहाणी तुझी

संपूर्ण असूनही का अधुरी....


आकाशाला गवसणी घालणारी तू

एक ना अनेक धुरा एकटी पेलणारी तू

दुर्गा तू, लक्ष्मी तू.सरस्वती तू

सऱ्या विश्वाची जननी तू

असे जरी कहाणी अधुरी तुझ्यातील क्षमतेने करशील पुरी....


स्त्री जन्मा तुझी कहाणी

संपूर्ण होईल स्त्री शक्तींनी 

कधी होशील दुर्गा तर कधी झाशी ची राणी

सातासमुद्रापार ख्याती तिची हीच ती रणरागिणी....

स्त्री जन्म तुझी कहाणी

पूर्णत्वास जाईल तुझ्याच आत्मशक्तींनी......

 

प्रतिक्षा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational