STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

4.5  

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

कलियुगातील सावित्री

कलियुगातील सावित्री

1 min
11


सण सौभाग्याच्या,सुवासिनींचा नटण्या मुरडण्याचा,

 जन्मोजन्मीच्या सोबतीची सांगड घालण्या सावित्री सजली.

या सगळ्यात जीन्स आणि पंजाबी वरची सावित्री

 जगाला थोडीशी विचित्र वाटली.


ऑफिस घर मूलबाळ संसार हे सांभाळून

तिने परंपरेची जोपासना केली.

बांगड्यासोबतच हातात तिने 

जबाबदारीची ढाल पेलली.

तरीही जीन्स आणि पंजाबी वरची सावित्री

जगाला थोडी विचित्रच वाटली.


मुहूर्ताच्या ऐवजी तिने वेळेची सांगड घातली

घरातील पोळी भाजताना तिने

तिच्या कर्तृत्वाची पोळी भाजली

स्वतःच्या शृंगारासाठी सुट्टीघेण्याची भावना

तिच्या जबाबदाऱ्यांनी अमान्य केली.

तरीही जीन्स आणि पंजाबीवरची सावित्री

जगाला थोडी विचित्र वाटली.


उणिवा शोधण्या तिच्या जगाने मात्र कायम धाव घेतली.

तिने मात्र परंपरेसोबत तिच्या नात्याच्या भावनेची नाळ जोडली.

सात जन्माची सोबतीसह तिने कर्तव्यही वाटून घेतली.

आणि जीन्स पंजाबी वरची ही कलियुगातली सावित्री

जगाला मात्र थोडी विचित्रच वाटली.


प्रतिक्षा 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational