स्वप्न
स्वप्न
निरागस अशा बंद डोळ्यासमोर ते उभं राहिलं
प्रत्यक्षात जेवढं घडत नाही तेवढं ते आल्हाददायक वाटलं
उजाडण्याआधीच ते हलकेच संपुनही गेलं
उघड्या डोळ्यांनी जे अनुभवता आलं नाही ते मी स्वप्नात पाहिलं।।
जे मनी दिवसभर वसलं ते रात्री स्वप्नात दिसलं
ज्याचा ध्यास मनाने घेतला त्याचाच ठाव स्वप्नात लागला
मनीची इच्छा पूर्ण झाली असा भास त्याने दिला
त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रयत्नांचा मार्गही त्यातच दिसला
स्वप्नाच्या दुनियेत त्या मन माझं हरवलं
उघड्या डोळ्यांनी जे अनुभवता आलं नाही ते मी स्वप्नात पाहिलं।।
किती बर झालं असतं जर हे जग स्वप्नावरच चाललं असत
हवं त्या गोष्टी करणासाठी मनही सरसावल असत
ईच्छा आकांक्षा पूर्ण करत सहज साधं आयुष्य झालं असत
या साऱ्यांनी जग सार सुखी झालं असत
असा विचार करणं सुध्दा एक स्वप्नच ठरलं
उघड्या डोळ्यांनी जे अनुभवता आलं नाही ते मी स्वप्नात पाहिलं।।
उघड्या डोळ्यांनी जे अनुभवता आलं नाही ते मी स्वप्नात पाहिलं।।