STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Romance

4  

Pratiksha vaibhav Kulkarni

Romance

समाधान

समाधान

1 min
367

समाधान नेमकं कशात असतं?

समाधान आपल्या मानण्यात असतं

असमाधानी वृत्तीमध्ये कधीही सुख नसतं

आनंदाचं गुपित हे समाधानी वृत्तीतच असतं।।


पायी चालणाऱ्या व्यक्तीला सायकलचं सीट हवस वाटतं

सायकलवरून जाणाऱ्याला दुचाकीच आकर्षण वाटतं

दुचाकीस्वाराला चार चाकीची मौज वाटते,

चार चाकीस्वाराच मन मात्र विमानात स्वार असतं

आनंदच गुपित मात्र समाधानी वृत्तीतच असतं।।



पाच पक्वान्न ताटात असले तरीही जेवण पोटातच जात

साध्या चटणी भाकरीतही पोट भरण्याच सामर्थ्य असतं

भुकेल्या पोटाला चवींचही भान नसतं

आनंदाचं गुपित हे समाधानी वृत्तीतच असतं।।



पैशाच्या मागे पळताना माणुसकीचा भान ठेवण महत्वाचं असतं

माणुसकीच्या जोरावरच तर हे जग चालत असतं

पैशाला पैसा जोडून फक्त एक घर उजाडत असत

माणसाला माणूस जोडून मात्र माणुसकीच नात फुलतं


आनंदाच गुपीत हे समाधानी वृत्तीतच असतं।।

आनंदाचं गुपित हे समाधानी वृत्तीतच असतं।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance