STORYMIRROR

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

4  

Pratiksha vaibhav Kulkarni

Inspirational

बाप

बाप

1 min
270

आज त्याच्या आयुष्यातला आनंदाचा तो क्षण होता

वाढती जबाबदारी पेलत तो बाप बनला होता

बेफिकर आयुष्य जगणारा तो आज जबाबदार बनला होता

आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस तो आज जगत होता

कारण तो आता बाप बनला होता।।


बिनधास्त आयुष्याकडे पाहत असताना आज कुठेतरी तो दबकत होता

पिल्लाच्या ओढीने सतत मनाशीच झुंजत होता

पिल्लाच्या डोळ्यात स्वतःसाठीचा आदर पाहून मनाशीच फुलत होता

करण तो आता बाप बनला होता।।


जिभेने बेलगाम असलेला तो त्याच्यात मुलासाठी मधाळ बनला होता

मुलाच्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणून साऱ्या जगाशी लढायला तयार होता

मुलांसमोर कठोर वागत असला तरी, त्याच्या काळजीत रात्र रात्र झुरत होता

स्वतःच्या गरजांनाही मुरड घालून तो मुलांच्या पायाशी सारी सुखे आणत होता

कारण तो आता बाप बनला होता।।


मुले मोठी होत असताना समाधानाने मनोमन खुश होत होता

मुलांच्या प्रत्येक यशासाठी आनंदाने मिरवत होता

संसार मुलाचा थाटण्यासाठी अजूनही तो झुरत होता

करण तो आता बाप बनला होता।।


मुले मोठी झाल्यावर त्यांच्यासाठी अडचण तो ठरत होता

असे चित्र घराचे पाहून दुःखी तो होत होता

ज्याच्यासाठी सगळं आयुष्य ती झिजवत होता, त्यांच्यासाठीच तो आज बोज बनला होता

वृद्धाश्रमाची पायरी चढतानाही मुलाला आशीर्वाद तो देत होता

कारण तो आता बाप बनला होता।।


स्वतः दुःखी असला तरी मुलांसाठी तो हसत होता

तुटकी छप्पल पायात असूनही मुलाला मात्र बूट घेत होता

चार काम जास्त करून तो पिल्लांना खुश ठेवत होता

आता मात्र या साऱ्या आठवणींना उजाळा देत कुठेतरी खूप दुःखीही होता

वृद्धाश्रमात राहूनही मुलाच्या सुखासाठी प्रार्थना तो करत होता


कारण तो आता बाप बनला होता।।

कारण तो आता बाप बनला होता।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational