Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Pratiksha vaibhav Kulkarni

Tragedy

2.5  

Pratiksha vaibhav Kulkarni

Tragedy

शान

शान

1 min
332


उगवत्या सुर्यासोबत तेजस्वी सकाळ उजाडली

माझ्यासाठी मात्र ती समाप्तीची चाहूल ठरली

घरच्यांच्या ओढीने पावले माझी सरसावली

आई बाबांच्या मिठीसाठी मनाने धाव घेतली

कोण जाणे कशी काय मनाने आज माघार घेतली

घरी जाण्याची ओढ असूनही पावले मात्र सीमेवरच्या रेंगाळली

अघोरी अशा हल्ल्याने त्या कारकिर्द माझी संपवली।।

 

असंख्य अशा वेदना साऱ्या शरीरात पसरत होत्या

मनात मात्र विचारांच्या लाटा कोसळत होत्या

भारतमातेचा पुत्र म्हणून जबाबदारी मी घेतली

देशासाठी अखंड लढण्याची इच्छा अपुरीच राहिली

त्यातही एक गोष्टीने भावना माझी सुखावली

देशासाठी लढत लढतच प्राणाने माझ्या आहुती दिली

अघोरी त्या हल्ल्याने कारकीर्द माझी संपवली।।


आई बाबांच्या डोळ्यातील अश्रू नाही पुसता आले जरी

भारतमातेसाठी काहीतरी केल्याचा आनंद असेल त्यांच्या उरी

बायकोच्या भाळावरच्या कुंकवाचा रंग आता पुसला जाईल

तिरंग्याचा भगवा रंग मात्र माझ्या मृत्यूचा सन्मान करील

तिरंग्यात लपेटून जाण्याची शानच आहे वेगळी

तिरंग्यात दिसे आता मला माझी माऊली

अघोरी हल्याने त्या कारकीर्द माझी संपवली।।

अघोरी हल्ल्याने त्या कारकीर्द माझी संपवली।।



Rate this content
Log in