STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

अवलिया...

अवलिया...

1 min
2

'कुणी घर देता का घर' म्हणत   
'नटसम्राट' होऊन रंगमंचावर जगले..
तर कधी ' कंट्रोल उदय भाई ' 
म्हणत मनामनात जाऊन बसले..

जाती धर्मातील तेढ रुद्र ' प्रताप '
होऊन ' क्रांतिवीर ' म्हणून मांडली..
तर कधी ' प्रकाश आमटे ' बनून 
जन माणसाला माणुसकी शिकवली..

'अग्निसाक्षी ' मधील 'सायको '
विश्वनाथ अभिनयाचा अंगार होता..
' खामोशी ' मधील मूकबधिर पालक 
जोसेफ संवेदनशीलतेचा हुंकार होता..

'नाम' फाउंडेशनद्वारा बळीसहाय्याने 
शिवछत्रपतींचा वारसा चालवला..
नाव आभाळाएवढं होऊनही 
पाय नेहमी जमिनीवरच ठेवला..

' साधी राहणी उच्च विचारसरणीने
तुम्ही स्वाभिमानी महामेरू आहात..
साऱ्या जगाला हेवा वाटेल असे 
कलाविश्वातील ' अवलिया ' आहात..

नाना.. आज तुम्ही नाहीत पण 
तुमचा अभिनय मरणार आहे..
तुमचा आवाज, तुमची भूमिका 
मनामनात सदैव जगणार आहे..

चित्रपटसृष्टीचा 'वजीर' असलेल्या
अभिनयसम्राटास भावपूर्ण श्रद्धांजली..
पहाडी आवाजाच्या या अजरामर 
कलाकारास विनम्र आदरांजली..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics