STORYMIRROR

Jayshri Dani

Classics Others

4  

Jayshri Dani

Classics Others

मन पाऊस पाऊस

मन पाऊस पाऊस

1 min
374

मन पाऊस पाऊस

ओली पापणीची कड

आत दाटले आभाळ

आठवून पडझड


मनातल्या मयुरास

थेंबथेंब नाचावया

झडझड झडी पिसं

विसरुन दु:खमाया


सुख भोगाया ओलावे

जरी धूर काळा निळा 

सावळयाशा नभांचाच

अंबरात गोतावळा 


मन पाऊस पाऊस

त्यात सरींचा उखाणा 

भेग भेग उजवाया

पेरू अमृताचा दाणा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics