रेघ चाफ्याची
रेघ चाफ्याची
1 min
187
गर्द चाफ्याच्या एकांती
घनओले शत स्तोत्र
वळचणीत पाखरे
मज पुसतसे गोत्र
फुलांच्या भवताली
पानांचा हिरवा पिसारा
तू हाक मजला देता
लाटांत शहारे वारा
बाळ निजले असता
पक्षी एकटाच उडे
संध्याप्रहरी किनारा
गलबतामध्ये बुडे
डोळ्यांत टपोरी तेव्हा
रेघ चाफ्याची ओढता
अंगाईत लपलेल्या
ओळींची होई सांगता
