पुन:र्जन्मी
पुन:र्जन्मी
मज आवरेना ! मोह फुलांचाही !!
दाह काट्यातही ! मितभाषी !!
सोसून काहिली ! सानुली फुलते !!
माळून झुलते ! दु:खवेणा !!
आवेगले मौन ! क्षणिक जो गौण !!
दूरस्थ तो कोण ! अंतर्यामी !!
सहजसुंदर ! शुभ्रसे प्रहर !!
निळाई जहर ! जळीस्थळी !!
साहावा कितीसा ! आत्मदायी क्लेश !!
त्यागूनिया वेष ! पुन:र्जन्मी !!