आविष्कार!
आविष्कार!
कोण पुरवी फुलांना
हे रंग सुगंध त्यांचे?
काढी कोण डिझाईन
या फुला पानांचे!
रस हे गोड फळांमध्ये
ओती कोण?
आल्या कशा अवीट चवी
या धान्यांतून?
धरे पोसे वाढे जीव कसा
ईवल्या ईवल्या बीजातून?
चमत्कार निसर्गाचा म्हणू
की आविष्कार ईश्वरी हा?
लागती कष्ट तपस्याही
कोणत्याही निर्मितीस!
नष्ट करण्या एक क्षणही लागत नाही!
म्हणून होतो नतमस्तक मी देवापुढे
दे सद्बुद्धी सर्वांना सारे जपण्यासाठी!