संभ्रम!
संभ्रम!
देव ही
स्तुतीला भाळतो
मग मर्त्य
मानवाचे काय?
जे जे चांगले
तेच वाटे भले
वाईटास नाही
कुणीच वाली!
जे जे जसे आहे
ते
स्वीकारण्या
अतुट धैर्य हवे!
जुळवून घेणे
ही पण आहे
खडतर तपश्चर्या!
आणि त्यात समाज
भोवती
अती उत्कंठ
चिकित्सक कठोर!
जगावे कसे सुखाने
ते कळतंच नाही!
सुरेश कुळकर्णी
