अगं आई सांग ना!
अगं आई सांग ना!
अगं आई सांग ना
येईल ना किती किती मजा ?
जमिनीत पेरताच
मी हे चॉकलेट
त्याचे झाडच मिळेल ना मला ?
त्याचे झाडच मिळेल ना मला ?
चॉकलेटस येतील भराभरा!
पोटभर खाईन वाटुन टाकीन
सगळ्यांना मी झराझरा!
पेरता मी चीज पिझा
लागतील का गं
पिझ्झे या झाडाला ?
टाकताच मी एक आंबा नदीत
सारी नदीच बनेल का गं मॅंगो माझा ?
सगळ्यांना बोलावीन
शानदार पार्टी करीन
भाव वाढेल माझा
किती भाव वाढेल माझा!
आई येईल ना गं मजा किती
जर मिळेल रहायला बार्बीहाऊस !
नटून थटून ऐटित बसेन
खिडकीतून छान टाटा करीन !
आई येईल ना गं मजा किती
टॉयकारने फिरायला
पेट्रोल टाकुन जगभर फिरेन
नको कुणी मग अडवायला !