मीडिया
मीडिया
प्रभाते भ्रमण ध्वनी हातात घ्यावा
व्हाटसॅप फेसबुक ट्विटर पहावा
इन्स्टाग्राम टेलिग्राम बघावा
ह्याचे त्याला त्याचे ह्याला धाडूनी द्यावे
ई सुप्रभात ई वाढदिवस
ई शुभेच्छा ई केकदान
ईमोजी पाहूनी धन्य व्हावे
ई बातम्या ई रेसिपीज
ई राजकारण ई समाजकार्य
ई खरेदी ई काळज्या
ई ज्ञानवृद्धी ई सद्बुद्धी
ई करमणूक ई दुर्बुद्धी
ई अर्थ व्यवहार ई अर्थवृद्धी
घरुनी जगाचा घ्यावा आढावा
न मागता मत प्रदर्शित करावे
चुकता माफी मागून मोकळे व्हावे !
उडवीता अशा त्या वावड्या विविध रंगी
रंगीत पडद्यावर रंगूनी जावे!
रोज सोडवावी नव नवीन कोडी
नवे मित्र जोडी लागे मग गोडी
मनाची थोडी थोडी कोंडी फोडी !
अशा भ्रमण ध्वनी ला नित्य पुजावे
जवळ बाळगून रिचार्ज करावे!
दिवस महिने वर्षे अशीच सरावी
भ्रमता भ्रमता अवचित भोवळ यावी
मनोभावे सर्वांची मग रजा घ्यावी
आणि गटातून गुपचुप निघूनी जावे!