धूलीवंदन!
धूलीवंदन!
या धुळीला वंदन करुनी
भाळी अपुल्या टिळक लावू या
जाळुनी षड्रिपु भस्म पवित्र
अंगी माखूनी प्रगती साधूया
या धुळीला वंदन करुनी
भाळी अपुल्या टिळक लावू या
भेद मिटवूनी मने मिळवूनी
जुनीच नाती पुन्हा जपू या
प्रेम भरे हे रंग गहीरे
जीवनात या पुन्हा भरुया
निर्व्याज मनाने परत भेटूया
या धुळीला वंदन करुनी
भाळी अपुल्या टिळक लावू या
नवी उमेद नव्या योजना
नव शक्तीने नव वर्षाचे
स्वागत करण्या सज्ज होऊया
या धुळीला वंदन करुनी
भाळी अपुल्या टिळक लावू या