अंतराकिनारी..!
अंतराकिनारी..!
अपार, कातर निळाईतली
स्वर तारकातले जे छळू लागले
अंतरातूनी फुटले हे अंबर, सूर
माझे मला ही कळू लागले
लहरती ही वात, जी वळणावरी
वाट झुळकेपरी, ही वळू लागली
नकळते डोंगरी, दोन शब्दांपरि.,
ठेच मेघास ही जी हळू लागली
हळवा हा बोध झळके असा की,
कुजकी मुळे जी उन्मळू लागली
लखाखे तारका न् कोपरा अंबरी
जी पणती अंधारी जळू लागली
विखुरले चांदणे प्राणात माझ्या
जो गारवा देहास मिळू लागला
अंबराची लाट अंतराकिनारी, जो
किनाराच सागर गिळू लागला..
