STORYMIRROR

Manisha Patwardhan

Classics

3  

Manisha Patwardhan

Classics

जीवन गाणे

जीवन गाणे

1 min
246

खाली धरती

गगन वरती

हेच माझे

असे सदन...


गगनात तारे

चम चम चम

धरतीवर प्रकाश

कण कण कण


गवताचे ते

तण तण तण

अंकुर उगवले

क्षण क्षण क्षण ...


पवन वाहे

झुळ झुळ झुळ

झरा वाहतो

खळ खळ खळ ...


पानांची चाले

सळ सळ सळ

पक्षांची चाले

किल किल किल ...


मंजुळ ध्वनी हे 

किण किण किण

हेच असे माझे

जीवन धन ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics