STORYMIRROR

Manisha Patwardhan

Abstract

3  

Manisha Patwardhan

Abstract

श्वान सभा

श्वान सभा

1 min
107

भटक्या श्वानांची रस्त्यावर

आज दुपारी सभा भरली

त्यांनीच सगळ्या प्राण्यांमध्ये 

पहिली पहा बाजी मारली ...


एक मतांने साऱ्या जणांनी

ठरवला होता एक पण

बेवारशी आपण सारेच

तूच कर आमचे रक्षण ...


माणूस राजाला गेले पत्र

विनंती नाही धमकी मात्र

किती जणांना करू मदत

राजा जाहला गलित गात्र ...


प्रयत्न राजाने न सोडले

कोणी केले नाही तेही केले

हळूच साऱ्याच प्राण्यांनाही

कष्ट करणे हे शिकवले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract