STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

तुझ्या माझी स्वप्न

तुझ्या माझी स्वप्न

1 min
114

तुझ्या माझ्या स्वप्नांना

प्रेमाची एक किनार

जोडून एकेक धागा

संसारात वेचू सार ...


स्वप्नासाठी करू कष्ट

होत नाहीत जडभार

अथक प्रयत्नांनी सुध्दा

पचवू घास कडूजार ...


जोड तुझी असतांना

कोणाची मज भिती नसे

सदैव आनंद मनात

सुप्त कसा दडलेला असे ...


जोडी तुझी अन् माझी

साता जन्माची असे गाठ

सात पावले चालता चालता

ठरून गेली अतूट वाट ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational