मराठीचा अभिमान
मराठीचा अभिमान
*मान* बहुत मनात
मराठी भाषेवरती
*मान* उंचावते माझी
शब्द मराठी सजती ...
*भूषण* वाटे भाषेचे
भासती शब्दालंकार
*भूषण* मम मनात
वाचूनी उठे झंकार ...
*संत* वाणी मराठीत
अभंग रचना छान
*संत* वाचतात पोथी
मनी मराठीचा मान ...
*वट* वृक्ष पसरला
देशविदेशात कुळ
*वट* मराठी मनाची
विदेशी रुजले मुळ ...
*शाळा* शिका मराठीत
मातृ भाषा अभिमान
*शाळा* घेऊन मुलांची
राखा मराठी सन्मान ...
मान.. सन्मान , अवयव
भूषण .. मान , दागिना ,
संत ... साधू , आडनाव
वट... वृक्ष , ताबा
शाळा ... विद्यालय , शिकवण