STORYMIRROR

Manisha Patwardhan

Others

3  

Manisha Patwardhan

Others

शेती

शेती

1 min
174

वावर असुदे शेतात

पीक येईल ते जोमात

वावर .. करा मशागत

रमुया शेतीच्या कामात ...


वाफे पाडले शेतामध्ये

बियाणे शिस्तीत पेरले

वाफे वरती अन्नधान्य

मऊसूत पहा शिजले ...


लावणी लावूया शेतात

पाणी, माती केला चिखल

लावणी रंगली सुरेल

विरंगुळ्याचे हेच स्थळ ...


जीवन सोडले शेतात

शेणखत  थोडे घातले

जीवन उभारले पहा

जोमात पीक उगवले ...


वावर ---- शेत , राबता 

वाफे ---- शेतात पाडलेले भाग , उष्णतेने आलेली वाफ 

लावणी ---- पिकाची , गीत प्रकार

जीवन ---- पाणी , आयुष्य


Rate this content
Log in