STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

दीपावली

दीपावली

1 min
112

दीप लावला अंगणात

प्रकाश पहा पसरला

दीप जन्मला आज घरी

आनंद घरास जाहला ....


उन्हाळा किती जीवनात

त्यातही आनंद शोधतो

उन्हाळा हा कडकडीत

शांत प्रकाशी सुखावतो ...


गंध पिकल्या त्या भाताचा

पवनासंगे आसपास

गंध टिळा लावून देवा

भरभराट येवो पिकास ...


मेघ जणू भासे कंदील

दारापुढे दिसे झकास

मेघ पाही आकाशातून 

प्रकाश असे , की आभास ...


दीप... दिवा , मुलगा

उन्हाळा... कष्टमय जीवन , तापमान

गंध .... सुवास , चंदन

मेघ ... घुमट , ढग



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational