STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

2  

Manisha Patwardhan

Inspirational

पंढरीची वारी

पंढरीची वारी

1 min
79

कार्तिक मासात 

एकादशी आली

गर्दी पहा झाली

पंढरीस ...


चला जाऊ चला

पंढरीची वारी

विठ्ठलाच्या दारी

लीन होऊ ...


भक्तीत रंगले

भजनी किर्तनी

अभंग नर्तनी 

रंगभरू....


विठू तुझ्या पायी

आले मी धावत

मस्तक ते नत

पायावर ...


तुझ्या भजनात

मिळे सुख शांती

मनी नसे भ्रांती

विठुराया ...


केली पुजा अर्चा 

रंगले भजनी

मन समाधानी

भाव भक्ती ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational