STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Inspirational

4  

अरविंद कुलकर्णी

Inspirational

सारे म्हणतात

सारे म्हणतात

1 min
474

सारे म्हणतात मी कविता करतो

पण.....


कोणासही माहित नसते

व्यथा वेदनांना मी जेव्हा

वेचून वेचून गोळा करतो.

सारे म्हणतात मी कविता करतो


रात्र रात्र जागतो तिच्या साठी

वाट तिची पाहत राहतो

ईतकी रुसते कधी कधी

हातातला कागद कोरा राहतो


सारे म्हणतात मी कविता करतो


कळा अंतरातल्या माझ्या

सांगू कशा कुणाला

उरातल्या वेदना जेंव्हा

कागदावर लिहितो


सारे म्हणतात मी कविता करतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational