STORYMIRROR

Shabana Mulla

Inspirational

4  

Shabana Mulla

Inspirational

पर्यावरण

पर्यावरण

1 min
470

वृक्ष लावुन अंगणी

फुलझाडे फुलवावी

फळझाडे मोठी मोठी

बांधावर उगवावी


सजवावा परिसर

झाडे लावुन शोभेची

देखभाल करा जशी

माय करे लेकरांची


जंगलात करू नका

तोड मोठाल्या वृक्षांची

माती जाईल वाहुन

हाल होतील पक्षांची


वन्य प्राणी जंगलाचे

समाधान मानतील

वृक्षतोड केली नाही

आनंदाने राहतील


समतोल राखा तुम्ही

आता पर्यावरणाचा

नाहीतर बिघडेल

तोल वातावरणाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational