STORYMIRROR

Shabana Mulla

Romance

3  

Shabana Mulla

Romance

तुझ्या प्रीतीत धूंद मी

तुझ्या प्रीतीत धूंद मी

1 min
721


प्रित तुझी गवसली

धुंद मन कसे झाले

मंद मंद प्रकाशात

उजळून मी निघाले


एकांतात मी बसता

दिसतोस तू समोर

नजरा नजर होता

कळी खुले गालावर


सुंदर वाटे जग हे

आज नव्याने मजला

बोलू वाटे झाडांशी रे

पाहे त्यातही तुजला


वाट तुझीच पाहते

लवकर ये सजणा

शृंगारले स्वतःला मी

जवळ मला तू घेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance