माझे लेक
माझे लेक


जन्म मुलीचा होता क्षणी
निराशा सगळ्यांची होते
स्वागत करतात मुलाचे नेहमी
स्थिती अशीच का उद्भवते?
वेळ कशी पुढे निघून जाते
मुली बापाच्या लाडक्या होतात
बापाच्या सेवेसाठी सदैव
तनमनाने झटत असतात
प्रेम आपुलकी लावून त्यांना
आपले कर्तव्य निभावतात
जीव असतो जन्मदात्यामध्ये
त्यांच्याच संस्कारात त्या फुलतात
कष्टकरी बापाच्या मुली
अडीनडीला साथ देतात
फाटक्या संसारात सुद्धा
जोडण्याचे काम करतात
दुष्काळाची पोहोचली झळ
रान उजाड जरी पडले आहे
लेकीची साथ असेल तर
मार्ग समोर मिळतो आहे