रहस्य कविता
रहस्य कविता


काय सांगू कहाणी हो
माझ्या घाबरट मनाची
कित्येकांच्या तोंडून मी
ऐकली होती गोष्ट भुताची
एक दिवस जात होते
मी गावच्या ओढ्यातून
घुसघुस करत होते तिथे
ओढ्या काठच्या झुडपातून
अचानक दिसायला लागली
माझ्यापुढे मोठी सावली
घाम मला दरारून फुटला
आणि माझी दातखिळी बसली
खुणावायला लागली मला
वाकडेतिकडे तोंड करून
तोंडाला माझ्या फेस आला
त्या भुताटकीचे तोंड बघून
पळत सुटले जोरात
जीव हातात घेऊन
पाठलाग करत ती सुद्धा
आली माझ्या मागून
थांबले मग एका ठिकाणी
श्वास थोडा घ्यायला
वाटले कोणीतरी द्यावे
पाणी एक ग्लास प्यायला
दिसली समोर येताना
मैत्रीण माझी खास
मिठीच मारली तिला मी
मोकळा करून श्वास
धडकले जशी मैत्रिणीला
डोक्यावरची फांदी पडली खाली
जीवात जीव आला आणि
घडलेली घटना लक्षात आली