शेतकरी
शेतकरी
शेतकरी, शेतकरी
काय त्याचं ते जीनं...
मरतो उपाशीच
राबुनी रातदिन.
कसा त्याच्याच नशिबी
झोपडीतला अंधार,
होतं जगनं कठीण
होई जीवाला उदार.
फिटेना कधीच ते
कर्ज सावकाराचं,
हटेना संकट ते
त्याच गरीबीचं.
स्वप्न सारीच अधुरी
तो दिनरात झुरतो,
जगतपोशिंदा, शेतकरी
रोज आत्महत्या करतो.
कधी येतील सुखं
शेतकऱ्याच्या वट्याला?
मिळेल का खायला
पोटभर शेतकऱ्याला?