STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Others

4  

Author Sangieta Devkar

Abstract Others

ती # रंग बरसे

ती # रंग बरसे

1 min
211

ती असते शक्ति सृजनाची.

हिरवा रंग तिचा, ती सृष्टि ती माता.

कधी आसवे डोळ्यात तर कधी अंगार.

ती असते लाल रंग जणु रणरागिणी चा संहार.

ती असते नाजुक फुलासारखी कोवळी.

बागडनारे रंगीबेरंगी फुलपाखरु पिवळशार.

ती असते उद्याचा उष:काल .

नवचैतन्य आणि नवा अविष्कार.

जणु पांढरया रंगाची मोहक धार.

ती निळया आभाळा सारखी अथांग.

पाण्या सारखी नितळ नाही लागणार तिचा थांग.

समजलीच नाही ती तुला कधीच,

प्रत्येक रंगात , चराचरात तिचे अस्तित्व तिचा नाद

तिच्या शिवाय आयुष्य रंगहीन ,बेताल आणि बेनाद.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract