STORYMIRROR

prajakta birari

Abstract

4  

prajakta birari

Abstract

माय मराठी आठवते

माय मराठी आठवते

1 min
268

कार्पोरेट जगात स्वतःला कार्पोरेट ठेऊन ठेऊन

जेव्हा उबग येतो

भडाभडा बोलावस वाटत

भावनांचा निचरा करावासा वाटतो

तेव्हा मायमराठी आठवते

मुलाला हिस्ट्री मधल्या शिवरायांची

treaty of purandar काही केल्या समजत नाही

तेव्हा धाडधाड ती शौर्यकथा तो थरार जिवंत करावा वाटतो

तेव्हा माय मराठी आठवते

अरे बापरे आईग अरेऽऽ रे च्यायला‌ देवा रे

अस स्वतःच्याही नकळत व्यक्त होतो आपण 

तेव्हा मायमराठी आठवते

कधी कुणाला पत्र लिहावस वाटत

संस्कृत वचनांचा अर्थ लागत नाही तेव्हा

गावाकडच कुणी अचानक भेटत तेव्हा

संस्कारांचा विषय निघतो तेव्हा

शूभंकरोती म्हणावस वाटत

तेव्हा मायमराठी आठवते

तेव्हा मायमराठी आठवते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract