STORYMIRROR

prajakta birari

Inspirational Others

4  

prajakta birari

Inspirational Others

मुलगी म्हणजे...

मुलगी म्हणजे...

1 min
383

मुलगी म्हणजे

 घराच्या आतलं भलं मोठं शहर 

थंडगार वाऱ्याची थंडगार लहर.....


 मुलगी म्हणजे 

पावसाच्या सरीवर सरी 

नसताना किंमत कळते खरी ......


मुलगी म्हणजे 

पाण्यावरचे एकामागून एक उठणारे तरंग 

तळ ढवळून काढणारे एकमेव अंतरंग ....


मुलगी म्हणजे 

आईच्या डोळ्यातला गुलाबी रंग

 पंखांनी उडण्याचा बांधला चंग....


 मुलगी म्हणजे 

आपल्याच मनातली ओळख आपली 

भरलेल्या जखमेवरची नाजूक खपली .....


मुलगी म्हणजे 

दवबिंदूची ओल 

मातीमधली मुळे खोल.....


माझी मुलगी

आहे अशीच अगदी छान

मुग्ध करते तिची सप्तसूरांची तान......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational