STORYMIRROR

prajakta birari

Tragedy

3  

prajakta birari

Tragedy

सण...

सण...

1 min
218

इथे मुश्किलीने गिळायला मिळतात घास चार 

त्यात वर्षाकाठी का येतात इतके सणवार 


श्रीमंतांची श्रीमंती येते कूस बदलायला 

का गरिबाची नस दुखरी, येते दुखवायला 


काय करायचं गोड-धोड दर पाळीला

कुठून आणायचं उसणं बळ प्रश्न पडतो आईला


चिंता असते तिला, हा दिवस कसा काढायचा

साखर चुरमा तोच तो, कसा बरं वाढायचा 


त्याच चुरम्याचा कधी लाडू कधी बर्फी ती करते

एकाच पदार्थाला वेगवेगळे रूप तेवढे देते


मुलं म्हणतात, सगळे सण एकाच दिवशी आले असते आई तुला सारखे 'आकार' बदलावे लागले नसते


आईचा जीव अगदी मरून मरून जातो 

तरी होळीला पुरणाचा वास दुरुन येतो 


वासाला आले कुठले डोळे अन कुठले कान

आईला दिसू लागते मुलांच्या पुढचे रिकामे पान


गरिबाकडे सण साजरं करणं खूप कठीण असतं

मरणासन्न दुःखी घरापेक्षा ते काही कमी नसतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy