या अशाच असतात
या अशाच असतात
स्वतःहून त्या कधीच
काही नाही मागणार
मनातलं ओठांवर
कधी नाही सांगणार.......
एकविसाव्या शतकातही
अंमळ मायने
लगेच मोहरणार
मोहरल्यावर सर्वांसमोर
अगदी मिरवणार.......
जिथे मिळाली ओल
तिथेच त्या रूजणार
थोडं खट्टू झाल की
लागलीच रुसणार .........
समोरच्यानेच ओळखावं
त्यांना काय हवं
जुन्याने चालणार आहे
की हवय काही नव ..........
काही खायचंय का विचारल्यावर
त्या नाहीच म्हणणार
हाती बळजबरी दिल्यावर
खणून खणून खणणार..........
शेला कितीही उंच गेला तरी खुंटा जमीनीत
घट्ट रोवायचा असतो ये त्यांना आहे पक्क ठाऊक
दाणा दाणा वेचून त्यांना
प्रगती करायची असते घाऊक ........
आतल्या गाठीच्या
त्या तशा नसतात
काय करणार बाया आणि बिया
या अशाच असतात
