तो म्हणाला....
तो म्हणाला....
तू फक्त जरा हास
तो म्हणाला
तडकलेल्या ओठांवर जीभ जरा घास
तो म्हणाला..........
काट्यांना विसरून घे फूलांचा वास
तो म्हणाला
आठव आपले ते खास क्षण
तो म्हणाला.......
तूझे सारे उसासे झेलण्या तयार आहे हा दास
तो म्हणाला
कशाला मोजतेस तू उगाच श्र्वास
तो म्हणाला........
बागेत ये जराशी, जंगलात राहणे बास
तो म्हणाला
पाहून आपल्याला, दुःख ही होईल उदास
तो म्हणाला..........
माझ्यासाठी फक्त घे थोडा त्रास
तो म्हणाला
आतल्या कॅन्सरच्या गाठी विसरुन
माझ्यासाठी खाऊन घे दोन घास
तो म्हणाला.........
