जा आनंदी रहा
जा आनंदी रहा
वनातल्या गुलाबाने रुसावे ते कशाला
घरातल्या फुलांना तू फसावे ते कशाला
उगाचच्या नखऱ्याला तू फेकीते अदा ती
उसासे टाकताना ते नसावे ते कशाला
तुला तुझ्या मित्रांनी वेढले काही तसे ना
बघाया वाट माझी तू बसावे ते कशाला
घरच्या त्या फुलांचे ते हसू काही जमेना
गुलाबी तू तशेची गं हसावे ते कशाला
स्वच्छंदी जीवनाने तूज प्रेमाने धरीले
नि माझ्या बंधनाना तू कसावे ते कशाला
