आक्रोश माऊलीचा
आक्रोश माऊलीचा
आज एक अनपेक्षित
घटना घडून गेली
पाहता फेसबुक
पायाखालची जमीन सरकली
कारण अनपेक्षित मृत्यूची
पोस्ट होती ती
वाचून मनात रडत
होती मी
अगोदर तर माझा
विश्वासाचं बसेना
पोस्ट वाचून तीनदा
तीनदा मला काही कळेना
गाडीतून उतरले
विचार करत जात होते मी
ज्या घरात झाला होता
मृत्यू तिथे गेले मी
तेथे गेल्यावर कळलं
पोस्ट खरीच होती
त्यांच्या घरात बरीच
मंडळी जमली होती
मला ते चित्र पाहून
काहीच सुचत नव्हतं
कारण मला ही रडू
काही केल्या आवरत नव्हतं
असा कसा वाद
नवरा बायको त झाला
नवरा रागारागाने
थेट देवाघरी गेला
त्यांचे उडायचे म्हणे
खटके नेहमीच
दोघेही होते सुंदर
नव्हते कशात काही कमीच
तरीही राग आला की
काहीच कळत नव्हते दोघांना
त्यांच्या दोघांच्या भांडणात
दोष नका देवू लोकांना
तिनेही राग राग घेतली
म्हणे सहा महिन्यापूर्वी उडी
दोन्ही पाय झाले निकामी
तरीही त्याने तिची सोडली
नव्हती कधी साथ
त्यांचे होत होते भांडण
त्याने मारली लाथ
बायको गेली माहेरी
नवऱ्याला आणि लेकरांना सोडून
कोणाच्याही मनाचा
विचार न करता भावबंध तोडून
असे कसे अनपेक्षित
सर्व झाले
रात्र न दिनी नवऱ्याच्या
डोळ्यात पाणी येवू लागले
रात्र रात्र जागायचा
झोप येत नसे
सतत रडून रडून
डोळ्यात पाणी असे
असा विचार करता करता
झाला तो निराश
सर्वाशी बोलणारा
एकदम मनात झाला हताश
तरीही सर्वांशी तो
बोलू लागला हसून
मनातल्या मनात
पहात होता रडून
विचार करून
आणि सतत रडून
कधी गेला खोल नैराश्यात
त्याचे त्यालाच गेले समजून
अशाच एका काळरात्री
आली त्याला बायकोची आठवण
मनामध्ये अनेक कटू गोड
आठवणींची होती भरपूर साठवण
तरीही तो आतून खचला
मनाने तो कधीचाच दुभंगला
सावरायचं व्यक्त होण्याचा
केला अनेकदा प्रयत्न
तरीही काळ रात्र
पिच्छा काही सोडेना
मनातली गुलाबी
आठवण काही केल्या खोडेना
लेकरं गेले होते
गाढ झोपी
त्याने हाती घेतली
नकारात्मक विचारांची टोपी
त्याने नैराश्यातून बाहेर
येण्यासाठी केले मित्राला
मध्यरात्रीच फोन
मध्यरात्रीची वेळ होती
म्हणून उठेचना कोण
घेतली त्याने दोरी आणि
लावला गळाला फास
शून्य मिनटात तर
जीवनाचा खेळ खल्ल्यास
सकाळी लेकरं
उठली झोपेतून
दृश्य समोरील
पाहून गेली भानातून
होते घरात दोन लेकरं
आणि बाप
बाकीचे सर्व गावाकडे
होते नातलग
मुलांनी केला सकाळी
फोन गावाकडे
आणि घडलेली हकीकत
कळवली सगळीकडे
सगळे जण भरभरा
झाले की हो गोळा
मृत देह खाली काढून
शव विच्छेदन साठी केला मोकळा
शव घरी आणले
शोकसभा दारात
सर्व झाले निशब्द
आठवून त्यांचे गुण
म्हणून तर म्हणते मी
पावले उचला विचार करून
माता पिता शोक करून गेले करपून
कारण त्यांचे काळीज गेले हरवून
बायकोची तर दैन्य अवस्था
पाहवेना कारण तिला तर दोन्ही पायांनी चालवेना
अशी कशी बिकट स्थिती
निर्माण झाली
हसऱ्या घराला कोणाची
दृष्ट लागली
नाते जपा सर्वांनी
नका एकमेका गमवू
उगा छोट्या कारणाने
एकमेका संपवू
आले जीवन एकदा
छान सोबत जगा
उगाच कशाला
विनाकारण करता त्रागा
सर्वांशी करा मैत्री मनापासून
काय माहित आपल्या
मैत्री मुळे संवादामुळे
वाचेल आयुष्य हिरवण्यापासून
आपल्या अवतीभवती
बारीक ठेवा लक्ष
नैराश्याच्या विळख्यात
नाही ना कोणी
यासाठी रहा दक्ष
आपल्या दक्ष राहण्याने
वाचतील कोणाचे तरी प्राण
बहिणी चा भाऊ वाचेल
पत्नीचा पती वाचेल
भावा चा भाऊ वाचेल
लेकरांचा बाप वाचेल
विद्यार्थ्यांचा शिक्षक वाचेल
गावचा पुत्र वाचेल
मग सर्वांचे राहतील
जाग्यावर त्राण
असे कसे छत्र
बापाचे घेतले हिरावून
चिमुकले लेकर
रडू लागले तोंड फिरवून
