पळस मैत्री
पळस मैत्री
आहे जीवनी मैत्री महत्वपूर्ण
मैत्री नसेल तर सर्वच अपूर्ण
मैत्री माझी होती पळस झाड
मनात रुतलेल्या भावना बाहेर काढ
रोज निरंतर मी बोलायचे त्याच्या शी
कधीच कट्टी केली नाही
त्याने माझ्याशी
शाळेच्या अंगणात होते पळस झाड
खेळताना रोज मी दडायाचे त्याच्या आड
रोज रोज खेळताना
झाली गट्टी त्याच्या शी
एक दिवस नाही बोलले
तर हुरहूर वाटे मनाशी
आमच्या गप्पा
छान छान रंगायच्या
मी राहायचे बोलत
तो पाने हलवायचा
मी मनातून सुख दुःख
करत होते शेअर
कारण मनातून
तो घेत होता माझी केअर
आयुष्यात जेव्हा येत असे
भावनांचा कहर
तेव्हा आपल्या नात्यास
येत असे वसंत बहर
एवढी जिवलग मैत्री आपली
कळत नकळत जाहली
जीवनात माझ्या
तुझे महत्त्व खूप आहे
तुझ्या मनात माझ्याबद्दल
खूप ममत्व आहे
येता तुज मोहक फुलांचा बहर
न्हावून निघते सौंदर्यात शहर
फुटता तुला फुलांचे धुमारे
अंगावर येती पाहून शहारे
असे कसे सौंदर्य देव निसर्गाला देतो
पाहून मनात प्रसन्न भाव येतो
तुझ्या फुलांचे मोहक रंग
त्या रंगाने भिजते होळीत अंग
असा सुरेख
नैसर्गिक रंग
पवित्र आहेत
तुझे अंतरंग
जीवनात माझ्या
आनंद तुझ्या रूपाने आला
अशा निर्मळ आनंदाला
मी तरी गम वू कशाला
असा माझा पवित्र पळस
त्याला माहित नाही आळ स
सदैव उन वारा पाऊस झेलीत जातो
तरीही ना डगमगता तो उभाच राहतो
असा माझा पळस
माझ्या पाठीशी सदैव उभा राहतो
सर्व सुख दुःखात
निःस्वार्थ साथ देतो
अशी आहे माझी
निखळ पळस मैत्री
त्याला जाणार नाही
तडा याची आहे खात्री
