STORYMIRROR

Jayshree Munde

Tragedy

3  

Jayshree Munde

Tragedy

विरह

विरह

2 mins
127


विरह सख्या तुझा रे

रात्रंदिन छळ घे ई माझा रे


मन माझे अशांत होते

तव मधुर वचने ते तृप्त झाले


मज निशा छळू लागे 

तव स्तुती मज आठवे 


 स्तुती केली ना कोणी 

तुझी स्तुती मज आवडे

त्या स्तुती त तुझ्या सख्या

 अंतकरण भाव सापडे


मिलन होण्या आधीच 

विरहाचे ग्रहण लागे


सख्या प्रिया 

माझे मन गुंतले तुझ्या ठायी

कळत नाही करू काय मी त्या पायी


माझे मन मला खात आहे 

नकळत मी तुला दुखवत आहे


आयुष्यात असे विरहाचे वळण 

कोणाच्याही न येवो


आठवण येता तुझी 

डोळे येते भरून रे

जवळ असता मजला 

जाणीव होत नसे ही

मी राहू शकेना तुजविण

मन वेडे कधी गुंतले ते 

मलाच ना कधी कळाले


तुजवीण जगण्याची 

कल्पना मी साहू ही शकेना


या मनाला छळले सर्वांनी

तूच हळू फुंकर घाली 


मन शांत हो ई भारी


मम मन कळे फक्त तुजला

तू जवळ नसता उमजे हे मजला


तुझी अलोट प्रीती

मला आठवे

तू जवळ नसता 

दा टे नयनी आसवे


नयन माझे झरती

आठवणीत तुझ्या

माझे मन आहे तुझ्या हृदयी

हे कळले मला आता या समयी


असाच भावनिक आधार 

मज तू देशील ना

तुझ्या बाहुपाशात 

मला तू घेशील ना


विरहात तुझ्या

मन स्वच्छ झाले

त्यात तुझेच 

प्रतिबिंब सुरेख हो आले


वाहले भावनेत मी

वाह ले विरहात मी


सख्या तुझा विरह जर नसता ना झाला 

मनातलं गुपित हे ओठावर नस त आल्


आठवती मज गूज गोष्टी आपल्या 

नयनी श्रावण धारा ह्या दाटल्या


विरहात व्याकूळ प्राण माझे

तुला भान नसे ना याचे


तुझी माझी मैत्री आहे अंतरी

त्याच मुळे मजला 

विरहाचा शोक होय भारी

अशी निर्मळ माया

 गगन भेदणारी

थेट अंत करणात 

चिर काल टिकणारी


विरहात सख्या तुझ्या रे

मना शोक होय भारी

विरहाने शिकविले मज रे

जिवलग प्रीत लय न्यारी


विरह मनाचा मनाशी

 खेळ ज्वालामुखी शी


विरह भाव मनी पेटला 

वणवा मनात चेतला


विरहाची अग्नी परीक्षा 

नको आता मला रे

विरहाची सीमा रेषा 

ओलांडता ये ई ना मलारे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy