स्वरलता
स्वरलता
स्वर आहेत जीचे
मंजुळ कोकिळा वानी
ध्यानी राहील तिचा
स्वर सकलांच्या मनी
अशी सप्त सुर विजेती
आर्त गाणी लता गाती
सरस्वती सम भासे रूप
केस संभार दाट स्वरूप
धवल वस्त्र परिधान करुनी
चारित्र्य तसेच बेदाग ठेवुनी
मनीची आस मनी दाबूनी
कर्तव्य संभाळते मनातूनी
अनेक आवडीस घाली मुरड
संकटांची कोसळले दरड
तरीही हसून खेळून मिश्कीलपणे
तोंड दिले धैर्याने,आत्मविश्वासाने
लता ,आशा, उषा, मीना हृदय नाथ
भावंडे पिता मृत्यूने झाली अनाथ
दिवस आले त्यानंतर बिकट
संकतामागुन आले संकट
होती तीज आवड शिक्षणाची
परिस्थिती मात्र होती बेताची
सर्व भावंडाना जिद्दीने शिकविले
स्व पायांवर हिमतीने उभे केले
बाबांचा तो शब्द अखेरचा
सर्वांना लता संभालील याचा
खरा केला तो शब्द त्यांचा
घेवूनी भार अपार कष्टाचा
बालपणी ची एक आठवण
तीच तर आहे प्रेरणेची साठवण
गाण्याच्या स्पर्धा होत्या खास
मेव्हण्यानी दिले नोंदवून झक्कास
जेव्हा दीनानाथ यांना समजले
तेव्हा लतावर ते भयंकर चिडले
तुझा शास्त्रीय संगीत रियाज अपुरा आहे
तरी तू स्पर्धेत भाग घेऊ पाहे
घराण्याचे नाव जर आले खाली
मग पाहीन मी तुझी खुशाली
लतादीदी घाबरल्या जरा
आता जर गायीले नाही बरं
तर माझं नाही काही खरं
गेल्या लता दीदी स्टेजवर
गीत गायील्या मनावर
मा.दीनानाथ मंगेशकर
यांची थोरली मी कन्या
म्हणताच कडाडल्या टाळ्या
आणि मनोमनी त्यांची कन्या
असल्याचा आनंद द्विगुणित झाला
आत्मविश्वासाने गायल्या गीत
ना मनात ठेवली कशाची भीती
गाण्याची केली सर्वांनी स्तुती
पहिला नंबर येईल की नाही
हीच होती अंतरी भीती
लता दीदींच्या आवाजात
होती सहजता आणि श्रूतीमनोहर ता
होती नैसर्गिक लय ताल सूर
देशभक्ती गीताने येती रोमांच अंगावर
आणि नयनी वाहती अश्रुंच्या धारा
पसायदानाने वाढवली भक्तीवर प्रीती
सूर होते भावपूर्ण चित्त वेधक
लताला बसले परिस्थितीचे
चटके फार चित्र विचित्र
खाण्या पिण्याचे झाले हाल
दूध, तूप आवडे त्यांना फार
ते देखील मिळेना सार
वस्त्रांचे पण तसेच हाल
थंडीत मिळेना उबदार वस्त्र घालया
एकदा त्यांना लेडीज वॉच
घालायची हौस आली भारी
विनायकराव यांच्या कडे
केली असता मागणी
विनायकराव म्हणाले लता दीदी ला
तुला घड्याळ हवेच कशाला
अंथरूण पाहून पाय पसरा वे
समजून सांग तुझ्या मनाला
ते शब्द त्यांचे लागले जिव्हारी
जग आहे स्वार्थी व्यापारी
भावनाना इथे थारा नसे
विचाराची विसंगती सगळीकडे दिसे
आला पाहिलं नंबर दिदीचा
गळ्यात पदके होती चांदीची
मिळाला बक्षीस एक दिलरुबा
प्रतिष्ठा मान साबित राहिला
घराण्यात कोणालाही लता दीदींच्या
गाण्यावर विश्वासाचं नव्हता मुळी
सर्वांना वाटायचं मंगेशकर घराण्याचं
नाव जाणार आता धुळीला
रागात नाना गाणं
काय जमणार या पोरीला
लता दीदी मनोमनी उदास व्हायच्या
घरात खूप खूप रडायचं
पण त्यांनी धरली जिद्द
अशक्य वाटणारी गोष्ट
केली सराव आणि प्रयत्नांनी शक्य
सगळ्या जगात झाल्या प्रसिद्ध
मंगेशकर घराण्याचे नाव
केले पूर्ण जगात
असे साफल्य त्यांच्या प्रयत्नांना
आले
भारतरत्न, , पद्मभूषण
पद्मविभूषण असे राष्ट्रीय पुरस्कार मिळवले.
सर्वांचे नयन त्यांच्या यशाने दीप ले
बाबांच्या या गोड आठवणी
ठेवल्या मनी साठवूनी
बाबांचा अल्प असा सहवास
मनी वाटे खंत लता परिसास
मान सन्मान मिळाला खूप
तरीही त्यांचे होते साधे रूप
प्रांजळ सोज्वळ रूप तिचे
हेमा मंगेशकर नाव जिचे
व्यक्तिमत्त्व गुणग्राहक असे बहु
आदर्श गुणांचा सहवास असे चहू
दृष्टी त्यांची तीक्ष्ण आणि सूक्ष्म
त्यामुळे निरीक्षण होई अती सूक्ष्म
अशी आदर्श कन्या , आदर्श बहिण
आदर्श आज्ञाधारक व्यक्तिमत्व
अनन्यसाधारण प्रतिभावंत लता दीदी
तरीही होती किती किती साधी
