उत्सव नात्यांचा
उत्सव नात्यांचा
दीपावली आली घरोघरी
कोजागिरी पौर्णिमेला
आकाश कंदील
लावती अंबरी
प्रकाशाच्या दिव्याची आरास
परीसर वाटे झक्कास
दश दिशा उधळती
चहूकडे प्रकाश प्रकाश
स्वच्छता नांदे दारोदारी
लक्ष्मीचे आगमन हो ई घरोघरी
सारी असती हर्ष उल्हास त
नांदती भूवरी
दारी शोभे सडा
गवळणी आणि रांगोळी
आली आली दिवाळी
लावा पणत्यांच्या ओळी
सण असे हा औक्षणाचा
ध्यास घेवू आरोग्य रक्षणाचा
जीवापाड जपू या नाती
दारी लावू पणती
