STORYMIRROR

Jayshree Munde

Tragedy

3  

Jayshree Munde

Tragedy

मन दुभांगता उभयतांचे

मन दुभांगता उभयतांचे

2 mins
181

मन दुभांगता उभयतांचे

तुकडे तुकडे होती परिसाचे


का कोण जाणे असह्य

वेदना होते मनात


कोणीच नसते अवतीभवती

समजून घेणारं या जगात


दुःख सांगावे नेमके कोणाला

हाच प्रश्न पडतो वारंवार मनाला


दुभांगता मन उभयतांचे

त्याला फुटतात फाटे अनेक वळणाचे


असतात सात जन्माच्या गाठी

मनात निर्माण होतात अटी तटी


वारंवार उडत राहतात 

एकमेकांचे खटके


थोड कमी जास्त झाले

की विनाकारण माथा भडके


उभयतांचे नाते असावे 

अतूट मनापासून अंतरी


नाहीतर घेतील जीव

लागून शब्द ते जिव्हारी


का? कोण जाणे कोनातही 

नसते कशाचीच कमतरता


एकमेकांचा आदर विश्वास

न ठेवता वाढते नात्यात अस्थिरता


मन दुभंग होवू न देणे असते 

एकमेकांच्या हातात


एकाने पसरवले घर तर

दुसऱ्याने आवरायचं क्षणात


दुभंगलेले मन बसते दुःख चघळीत

त्याला मिळतात आरोप प्रत्यारोप


अश्या आरोप प्रत्यारोपन करीत

राहील्याने काय राम राहील नात्यात


दुखरे मन अधिक होणार 

अंतर्मुख आणि बसतील


मानगुटीवर त्याच्या अपेक्षांचं भूत

तरीही हाती लागणार नाही सुत


मन उभयतांचे आहे भारी घायाळ

त्यांना शब्द मिळतच नाहीत मवाळ


मन दुभंगलेल्या अवस्थेत 

जगणे होते खूप दुरापास्त भारी


तरीही जगतो माणूस याही

अवस्थेत झेलीत स्वार्थी दुनियादारी


मन दुभांगता होती हाल मनाचे

नाते तुटून जाये अंतरीचे


मन जाती एकमेकांपासून दूर दूर

मनी दाटते अनामिक हुरहूर


भूतकाळात हव्या असणाऱ्या गोष्टी

वर्तमानात होतात नको नकोश्या


ज्या गोष्टीची हवी असते 

पूर्तता आणि अथांगता


त्या गोष्टीची होत असते

हेटाळणी आणि दुभंगता


अशा दुःखी नात्यात होते 

दुःखी आत्मा भटकंती


मिळत नाही आनंदाचा 

मोहाचा एकही क्षण 


उभयंत नात्यात शोधतात उणीव

सतत करून देतात त्याची जाणीव


मनी दाटते निराशा 

मावळतात सर्व आशा


अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असूनही

निरर्थक वाटते जीवनाची भाषा


नयनी त्यांच्या असती उदासीनता

आयुष्यात येते कंटाळा, रटारता


असा जीवनसाथी लाभता 

होतो भावनांचा कोंडमारा


मनाला आणि आयुष्याला 

नसतो कुठेही स्थैर्य थारा


मनःशांती लोप पावते

विचारात चक्राव्यूह भोवती सारा


शांतीच्या शोधत भटकते

मन मग इतरत्र अटकते


कळता उभयंतात आला तिसरा

दुःख आतले कसे हो विसरा


उध्वस्त होता जीवन सारे

उरी वणवा झपाट्याने पसरे


नकारात्मकता नैराश्यात बदलते

जीवन आत्महत्येने विखुरते


म्हणून वेळीच दुभंगता सावरा

आणि मनाचे दुःख आवरा


मने जर एकमेकांपासून दूर जाती

तन तरी सांगा कुठून एकरूप होती


आयुष्य एक खेळ डाव

जिंकता होते पार नाव


हारता होते विस्कळीत कुटुंब

दिसत नाही ठळक प्रतिबिंब


सगळे होते धूसर धुके

शब्द होतात भावनाविना मुके


आयुष्याचे गणित चुके

सगळी घडी बसायची हुके


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy