STORYMIRROR

Jayshree Munde

Romance

3  

Jayshree Munde

Romance

प्रेम

प्रेम

2 mins
194

प्रेमात असावा आदर 

प्रेमात नसावा अनादर


प्रेमात असावी काळजी

प्रेम नसावे निष्काळजी


प्रेम असावे अथांग

प्रेम नसावे वरवर


प्रेम असावे थेट मनातून उगवलेले

प्रेम असावे मनापर्यंत पोहचलेले


प्रेम असावे आंतरिक आणि भावनिक

प्रेम नसावे वरकरणी आणि शारीरिक


प्रेमात नसावा कसलाही स्वार्थ

प्रेमात असावा आंतरिक परमार्थ


प्रेम असावे भावपूर्ण

प्रेम असावे अर्थपूर्ण


प्रेम नसावे एकतर्फी

प्रेम असावे दूतर्फी 


प्रेम असेल तर स्तुती होईल

प्रेम नसेल तर बदनामी होईल


असेल जर प्रेमाची लागलेली झळ

नाव ठेवल्यास नक्कीच येणार कळ


प्रेमात व्हावे वेडे पिसे

प्रेमात होऊ नये रिकामे खिसे


प्रेमात असावी ओढ आणि आपुलकी

प्रेमात नसावी तेढ आणि टवाळकी


प्रेमात असावी आतुरता आणि एकरूपता

प्रेमात नसावी कामुकता आणि बहुरूपता 


प्रेम असावे पुढे नेणारे

प्रेम नसावे मागे खेचणारे


प्रेम असावे परिसासमान लोहाचे सोने करणारे

प्रेम नसावे लोहासमान गंजणारे


प्रेम असावे अतूट आणि अभंग

प्रेम नसावे कटू आणि दुभंग


प्रेम असावे पवित्र 

प्रेम नसावे अपवित्र


प्रेमात असावा आधार

हल्ली प्रेमात दिसतोय पोरकेपणा फार


प्रेम असावे अबोल आणि अव्यक्त

प्रेम नसावे बदफैली असे सांगते शास्त्र


प्रेम करणं सोप असतं

ते टिकवणं मात्र अवघड


प्रेमात असते रिस्क फार

जिंकलो तर पार जाते नाव

हरलो तर होतो बेबनाव


प्रेम असावे टिकाऊ 

प्रेम नसावे टाकाऊ


प्रेम असावे निस्सीम भक्ती

प्रेम नसावे बोलायची उक्ती


प्रेम म्हणजे लागता ठेस मला

पाणी येई तुझ्या डोळा


प्रेमात असावी माणुसकी आणि नीती

प्रेमात नसावी अमानवता आणि अनिती


प्रेमात असावी मनमोहक प्रीती

प्रेमात नसावी हिंसक वृत्ती


प्रेमात असावा त्याग 

तो असावा जीवनाचा भाग


प्रेम असावे परोपकारी

त्याने सुख येई ह्रदयमंदिरी 


प्रेमात नसावे हेवेदावे आणि वासना

प्रेमात असावे पुढे नेण्याची मनोकामना


प्रेमात असावी नाविन्यता आणि रसिकता

प्रेमात नसावी रटाळता आणि अरसिकता


प्रेमाने येतो जीवनी आनंद आणि उत्साह

प्रेमाने जग जिंकू प्रत्येकाचे मन ओळखू


प्रेमात असावा मनाचा मनाशी संवाद

प्रेमात नको सततचा वाद आणि विवाद


प्रेम असते मनाचे मनाशी मिलन

नका होऊ एकमेकांचे विल्लन


प्रेमात असावे रुसवे लटके लटके

त्यामुळे उडू देवू नका सारखे खटके


प्रेम असावे मनातील स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी 

प्रेम असावे सकारात्मक ऊर्जा अंगात येण्यासाठी 


प्रेमात असावी जिवलग नाती

अन्यथा होते जीवनाची माती


प्रेमाने येतात जीवनी इंद्रधनुष्याचे रंग

प्रेमा विना बनते आयुष्य बेरंग


प्रेमात असते जीवनाची कसोटी

म्हणून सोडू नका जिद्द आणि चिकाटी


प्रेमात बहरते अंतरंग

प्रेमात उमलते प्रीतरंग

जीवनात उधळतात सप्तरंग


पडता पाऊल वाकडे चावतात खेकडे

प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावा

सन्मानाने जगण्याचा हेतू धरावा


प्रेम नसावे चंचल फुलपाखराप्रमाणे

प्रेम असावे अचल स्थिर दगडाप्रमाणे


प्रेमात असावी समर्पणाची भावना

करू आपण एकत्रित संकटाचा सामना


प्रेमात असावी सहनशीलता

त्याने वाढेल मनातील घनिष्टता


प्रेमात पडावं आपण एकदातरी

नाहीतर जीवन लटकेल अधांतरी


प्रेमात नसावा स्वैराचार

प्रेमात असावा एकमेकांचा विचार 


प्रेमात करावा एकमेकांचा विकास

अन्यथा जीवन होईल भकास

 

प्रेमात असावी एकमेकांची जाणीव

कधी काढू नये एकमेकांची उणीव


प्रेमातील उणीव एकांतात काढा

सर्वांसमोर वाचूया स्तुतीचा पाढा


प्रेमात व्यक्त होण्यास बंदी नसावी

प्रत्येकाची आवड निवड जाणीवपूर्वक जपावी


प्रेमात चिंता आणि संशय नसावा

पारदर्शकता आणि अतूट विश्वास असावा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance